घरफोडीत रक्कम, दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:14 IST2018-10-22T01:14:03+5:302018-10-22T01:14:22+5:30

बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना तिडके कॉलनीत घडली आहे़

Houseboat, jewelery theft | घरफोडीत रक्कम, दागिन्यांची चोरी

घरफोडीत रक्कम, दागिन्यांची चोरी

नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व गृहोपयोगी वस्तू चोरून नेल्याची घटना तिडके कॉलनीत घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रौनक पार्कमध्ये हेमंत गुंबाडे राहतात़ १७ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत ते कामासाठी बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १२ हजार रुपये रोख, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, पँडल, २ हजार रुपये किमतीची गॅस सिलिंडरची टाकी असा ३६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी गुंबाडे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Houseboat, jewelery theft