ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडून ३९ लाभार्थींना घरघंटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:22 IST2019-01-28T00:22:14+5:302019-01-28T00:22:34+5:30

ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (दि.२६) पंचायत प्रांगणात पार पडली. सदर ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात येऊन विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली

 House rent allotment to 39 beneficiaries from Gram Panchayat in Gram Sabha | ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडून ३९ लाभार्थींना घरघंटी वाटप

ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडून ३९ लाभार्थींना घरघंटी वाटप

पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (दि.२६) पंचायत प्रांगणात पार पडली. सदर ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात येऊन विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने ३९ लाभार्थींना घरघंटीचे वाटप करण्यात आले.  उपस्थित नागरिकांनी समस्या मांडल्या. सदस्य गणेश बनकर यांनी उत्तरे देत सर्व प्रकारचे दाखले नागरीकांना अल्पदरात मिळावे यासाठी पिंपळगाव शहरात केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी सरपंच अलका बनकर, उपसरपंच रु क्मिणी मोरे, विश्वास मोरे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, सुहास मोरे, सत्यभामा बनकर, अल्पेश पारख, किरण लभडे, सुरेश गायकवाड विश्वास मोरे, रामकृष्ण खोडे, बापू कडाळे, दीपक मोरे, सोनाली विधाते, दीपक विधाते, अंकुश वारडे आदी उपस्थित होते.

Web Title:  House rent allotment to 39 beneficiaries from Gram Panchayat in Gram Sabha

टॅग्स :Nashikनाशिक