शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

By admin | Updated: October 21, 2014 02:00 IST

रिपाइंच्या अस्तित्वाला धोक्याची घंटा

 

नाशिक : भाजपा सोबत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निर्णय रिपब्लिकन जनतेला फारसा रुचलेला नसल्याचे आणि भाजपानेही रिपाइंला प्रचारापासून दूरच ठेवणे पसंत केल्यामुळे आचार, विचार आणि संस्कारात भाजपा व रिपाइंत मोठी दरी असल्याचे लपून राहिलेले नाही. या निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसूनही आले. त्यामुळे महायुतीत रिपाइं कार्यकर्त्यांची घुसमट होणे ही रिपाइंला धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. आघाडी व युतीच्या फाटाफुटीनंतर सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, रिपाइंमध्ये मात्र निवडणूक लढण्याची ऊर्जा दिसून आली नाही. एवढेच नाही, तर भाजपा या मित्रपक्षानेही रिपाइंला बाजूलाच ठेवल्यामुळे ‘ढाण्या वाघ’ अशी गर्जना करणाऱ्या रिपाइंची अवस्था केविलवाण्या मांजरीसारखी आहे, हे कटूसत्य रिपाइंला स्वीकारावेच लागणार आहे. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिपाइंने राज्यातील ज्या आठ जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये देवळाली मतदारसंघाच्या जागेचाही समावेश होता. याच जागेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीदेखील पक्षाचा उमेदवार उभा करून रिपाइंचे अस्तित्व नाकारले होते. भाजपाचा निर्णय योग्य होता हे मतमोजणीनंतर समोर आले आहेच. रिपाइंने खेड्यापाड्यात जाळे विणले असल्याचे आणि रामदास आठवले यांना मानणारा वर्ग असल्याचे बोलले जात असले, तरी रिपाइंच्या प्रकाश लोंढे यांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागला. ठाम राजकीय भूमिका नसल्याने निवडणुकीच्या धामधुमीतही कार्यकर्त्यांना मरगळ आल्याने रिपाइंची ही अस्वस्था त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यापासून संघटनेने बोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.