ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. याची माहिती हॉटेलचालक विलास त्र्यंबक खातळे, रा. जुना गावठा, इगतपुरी यांनी पोलीस ठाण्यात दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकांनी घटनास्थळी पंचनामा केला. गळफास घेतलेल्या युवकाला खाली काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी युवकाला मृत घोषित केले. युवकाने गळफास का घेतला, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फकिरा थोरात व पोलीस पथक करीत आहे.
इगतपुरीत हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:39 IST