मालेगावी जनावरांच्या कातडीसह शिंगे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:47 IST2019-04-05T00:46:52+5:302019-04-05T00:47:07+5:30

मालेगाव मध्य : शहरालगत माळधे शिवारातील एका गुदामावर कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक व विशेष पोलीस पथकाने रात्री आठ वाजता छापा टाकला.यात जनावरांची १३१ कातडीसह २६४ शिंगे जप्त करण्यात आली असून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

The horns seized with the skin of Malegavi animals | मालेगावी जनावरांच्या कातडीसह शिंगे जप्त

मालेगावी जनावरांच्या कातडीसह शिंगे जप्त

ठळक मुद्दे २६हजाराचा मुद्देमाल मिळुन आला

मालेगाव मध्य : शहरालगत माळधे शिवारातील एका गुदामावर कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक व विशेष पोलीस पथकाने रात्री आठ वाजता छापा टाकला.यात जनावरांची १३१ कातडीसह २६४ शिंगे जप्त करण्यात आली असून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने माळधे शिवारातील गट नंबर ९२/२प्लॉट नंबर.५येथे पत्र्याच्या शेडमध्ये साठवुन ठेवण्यात आलेले जनावरांची १३१ कातडी व २६४ शिंगे असा २६हजाराचा मुद्देमाल मिळुन आला.पशु संवर्धन अधिकारी डॉ.जावीद खाटीक यांनी तपासणी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मुजम्मिल खान इब्राहीम खान रा. कमालपुरा व त्यांचा भाऊ यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The horns seized with the skin of Malegavi animals