कोरोनाच्या संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:43 IST2020-06-01T21:23:59+5:302020-06-02T00:43:07+5:30
सटाणा : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात न डगमगता अविरतपणे सेवा दिल्याने त्यांचा बागलाण वासीयांच्यावतीने सन्मान करून आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या सुरिक्षततेसाठी पीपीई किट्सचे वाटप केले.

कोरोनाच्या संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
सटाणा : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात न डगमगता अविरतपणे सेवा दिल्याने त्यांचा बागलाण वासीयांच्यावतीने सन्मान करून आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या सुरिक्षततेसाठी पीपीई किट्सचे वाटप केले.
सर्वत्रकोरोनाने थैमान घातले आहे. या महाभयंकर संकट काळात बहुतांश ठिकाणी या संकटाशी सामना करण्याऐवजी आपली रु ग्ण सेवा बंद केली. मात्र बागलाणच्या खासगी डॉक्टरांनी रु ग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून कोरोनाला हरवत अविरतपणे रु ग्ण सेवा देण्याचे काम सुरु ठेवले आहे. या सेवेबद्दल आमदार बोरसे यांनी येथील संपर्ककार्यालयात शहरातील डॉक्टरांचा सन्मान केला. या कार्यक्र माचे अध्यक्ष ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश जगताप होते.
यावेळी बालरोगतज्ञ डॉ. दिग्विजय शहा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जगताप, व्ही. के. येवलकर, विद्या सोनवणे, शशिकांत कापडणीस, अभिजित थोरात, शरद पवार, आशिष सूर्यवंशी, अमोल पवार, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.