लासलगावी कर्तबगार महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:43 IST2019-03-14T14:43:12+5:302019-03-14T14:43:21+5:30
लासलगाव : बचत गटाच्यावतीने येथील जिजामाता कन्या शाळेत महिला दिन सप्ताहानिमित्त समाजातील विविध कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

लासलगावी कर्तबगार महिलांचा सन्मान
लासलगाव : बचत गटाच्यावतीने येथील जिजामाता कन्या शाळेत महिला दिन सप्ताहानिमित्त समाजातील विविध कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. वाकी खु.ता.चांदवड येथील शहिद जवान शहाजी गोपाळा गोरडे दोन वर्षापुर्वी काश्मिर येथे सीमेवर लढत असताना शहिद झाले. त्यांच्या वीरमाता जनाबाई गोराडे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार, स्वयंसिद्धा महिलांचा प्रियंका जराड , सुशीला पाटील, कृष्णा राय यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी सदर कार्यक्र मास उपस्थित राहून कर्तबगार महिलांना प्रोत्साहित करून आपणही त्यांचेकडून प्रेरणा घेऊ तसेच महिलांचा सन्मान हिच भारतीय संस्कृती असल्याचे मत प्रेरणा महिला बचतगटाच्या अध्यक्ष पुष्पा दरेकर यांनी व्यक्त केले. सचिव फरीदा काझी यांनी एकीचे बळ व सकारात्मक विचार या संबंधी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून अनिता गंधे, हेमलता चव्हाण,उषा पवार, रंजना पाटील, कुसुम चौधरी, शलाका पानगव्हाणे, संध्या रायते, आशा पाटील, अनिता खैरे, , प्रतिभा इंदुलकर उपस्थित होत्या.सूत्रसंचलन अर्चना पानगव्हाणे तर आभार कल्पना परब यांनी मानले.