‘रोटरी’च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:44 IST2019-06-25T18:44:07+5:302019-06-25T18:44:20+5:30

सिन्नर : रोटरी क्लब आॅफ सिन्नर आणि गुरू गोविंदसिंग फाउंडेशन नाशिक संचलित गुरू गोविंदसिंग कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅँड रिसर्च सेंटर व गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्नीक यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिन्नर सार्वजनिक वाचनालयात पार पडला.

Honorability on behalf of 'Rotary' | ‘रोटरी’च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

‘रोटरी’च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

सिन्नर : रोटरी क्लब आॅफ सिन्नर आणि गुरू गोविंदसिंग फाउंडेशन नाशिक संचलित गुरू गोविंदसिंग कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅँड रिसर्च सेंटर व गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्नीक यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिन्नर सार्वजनिक वाचनालयात पार पडला.
गुरू गोविंदसिंग कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. निळकंठ निकम यांनी व्यावसायिक शिक्षणातील बदललेली प्रवेश प्रक्रिया तसेच करीअरच्या उपलब्ध संधी यावर सखोल मार्गदर्शन के. रोटरी अध्यक्ष संजय आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. गुरू गोविंदसिंग कॉलेजचे दादासाहेब भवर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उदय गायकवाड, चैतन्य कासार, प्राचार्य पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Web Title: Honorability on behalf of 'Rotary'