दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:41 IST2019-03-13T00:41:30+5:302019-03-13T00:41:30+5:30

शिव सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर व परिसरातील दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मातांचा मंगळवारी (दि.१२) स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Honor of the children of Divya's children | दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान सोहळा

दिव्यांग मुलांच्या मातांचा सन्मान सोहळा

ठळक मुद्देकृतज्ञता : शिवसह्याद्री सामाजिक संस्थेचा उपक्रम; कर्तृत्ववान मातांना सलाम

नाशिक : शिव सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर व परिसरातील दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या मातांचा मंगळवारी (दि.१२) स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला आपल्या विशेष मुलांसह उपस्थित होत्या. व्यासपीठावर सचिन पानमंद, सुरोजित शेनगुप्ता, सतीश गुंजाळ, बबलू मिर्झा, विशाल होनमणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विशेष बालकांनी विविध वेशभूषेत हजेरी लावून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची आपल्या क लागुणांनी मने जिंकली. गयाबाई साळवे, निळिशा शर्मा, मंजूषा शिंदे, मोनिका भांडारकर, शांता प्रधान, तृप्ती नागरे, सूचिता कुलकर्णी, प्रतिभा रत्नपारखी यांच्यासह सुमारे पन्नासहून अधिक मातांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Web Title: Honor of the children of Divya's children