महाराष्टÑ राज्य कबड्डी संघटनेकडून सह्याद्री युवा मंच चा पुरस्कार देऊन सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 05:36 PM2019-07-17T17:36:01+5:302019-07-17T17:36:22+5:30

सिन्नर: महाराष्ट्र राज्य कबडडी असोसिएशन व मुंबई उपनगर कबडडी असोसिशनच्या वतीने कबडडी महर्षी स्व. शंकरराव तथा बुवा सारुवे यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कबडडी असोसिएशन, कबडडी क्रीडा पुरस्कार सोहळा मंबई येथील रंगशारदा सभागृहात उत्साहात पार पडला.

Honor by award of Sahyadri Yuva Manch of Maharashtra Kabaddi Association | महाराष्टÑ राज्य कबड्डी संघटनेकडून सह्याद्री युवा मंच चा पुरस्कार देऊन सन्मान

महाराष्टÑ राज्य कबड्डी संघटनेकडून सह्याद्री युवा मंच चा पुरस्कार देऊन सन्मान

Next

सिन्नर: महाराष्ट्र राज्य कबडडी असोसिएशन व मुंबई उपनगर कबडडी असोसिशनच्या वतीने कबडडी महर्षी स्व. शंकरराव तथा बुवा सारुवे यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कबडडी असोसिएशन, कबडडी क्रीडा पुरस्कार सोहळा मंबई येथील रंगशारदा सभागृहात उत्साहात पार पडला. यात राज्य निवड अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सिन्नरच्या सह्याद्री युवा मंच ला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांनी सदर पुरस्कार स्विकारला.
महाराष्ट्र राज्य कबडडी असोसिएशनचा १९ व्या कबडडी दिन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६ व्या वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या काळात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषद व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि सहयाद्री युवा मंच यांया सहयोजनातून सदर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेची सर्व जबाबदारी सह्यद्री युवा मंचने समर्थपणे पेलली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्हयातील २५ महिलांचे व २५ पुरूषांचे असे ५० संघातील ६०० खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, स्वयंसेवक, पदाधिकारी असे एकुण १००० व्यक्ती या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Web Title: Honor by award of Sahyadri Yuva Manch of Maharashtra Kabaddi Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.