Homeopathy also helps in the treatment of coronary heart disease | कोरोनाबाधितांवर उपचारासाठी होमीओपॅथीचीही मदत

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी होमीओपॅथीचीही मदत

ठळक मुद्देमहानगरपालिकेचा फॉर्म्युला प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी साडेचार लाख नागरिकांना गोळ्यांचे वाटप

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आणि विशेष करून मृत्युदर कमी करण्यासाठी शासन मान्य उपचार पद्धती करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीचा वापर करता येईल तो करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य तपासणी करतानाच तब्बल साडेचार लाख नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. महापालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांवर शासन मान्य पद्धतीचे उपचार केले जात आहेत. परंतु त्याचबरोबर होमीओपॅथिक गोळ्यादेखील दिल्या जात आहेत. मालेगावमध्ये होमीओपॅथी आणि युनानी पद्धतीचादेखील वापर झाला होता. त्यासाठी त्या क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिक पुढे आले होते. त्याच धर्तीवर आता नाशिकमध्ये होमीओपॅथीचा वापर करण्यात येत आहे.
मालेगावी यासंदर्भात काम करणारे डॉ. लियाकत नामोळे आणि त्यांचे सहकारी हे सध्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात देखील उपचार कार्यात सहभागी झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केल्यानंतर नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ज्या चिकित्साप्रणालीची औषधे सोयीची वाटतात, तिचा वापर करण्यास सांगितले जात आहे.
याशिवाय महापौर सतीश कुलकर्णी यांची सूचना आणि शासनाचे आदेश यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात तब्बल चार लाख नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविणाºया अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
वेगवेगळ्या चिकित्सा प्रणालीचा नागरिक वापर करतात. काहींना आधुनिक वैद्यकशास्त्र तर काहींना आयुर्वेद आणि काहींना होमीओपॅथी आवश्यक वाटते त्यादृष्टीने कोणावर सक्ती न
करताना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोयीची औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
शासनमान्य उपचार
मालेगावमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी युनानी काढा उपयुक्त ठरल्याच्या चर्चा असल्या तरी महापालिकेने मात्र अशाप्रकारे अद्याप युनानीचा वापर केलेला नाही. होमीओपॅथीचा प्रत्यक्ष उपचारात सहभाग असून, शासन मान्यता असलेल्या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

Web Title: Homeopathy also helps in the treatment of coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.