शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पूरबाधित झाले बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:52 IST

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून ...

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या, राहुट्या सगळे काही वाहून गेल्याने मोलमजुरी करणारे विविध तालुक्यांमधून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या गोरगरिबांचा संसार गोदामाई वाहून घेऊन गेली.महापुराची तीव्रता बघून अनेक कुटुंबे भयभीत होऊन गणेशवाडी भागातील झाडाखाली तर काहींनी भाजीमंडईकरिता महापालिकेने बांधलेल्या इमारतीत आसरा घेतला. काहींना प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले; मात्र सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले. सामाजिक संवेदनांची जाणीव ठेवतपंचवटीमधील रहिवाशांनी जमेल तसे आपापल्या खर्चाने स्थलांतरित बेघरांना दोन वेळेचे भोजन उपलब्ध करून देत भूक भागविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून, दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते. रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे, असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे ४०० ते ५०० बेघर स्थलांतरित नागरिकांना सकाळ-सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक भिकूबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक भावना जोपासली.पुलालगत असलेल्या झोपडपट्टीला फटकागोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणाºया मोलमजुरी करणाºया नागरिकांना सर्वाधिक बसला. गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी, अमरधामजवळील झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूपपणे गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयgodavariगोदावरी