नाशिक : घर बंद करून आठ दिवस बाहेर गेल्याची संधी साधात बंद घराचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी घरात प्रवेशकरून टीव्हीसह एकूण चार हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना ओझर शिवारातील जाधववाडी येथे घडली.जाधववाडी सुरेश धर्मराज जाधव कुटुंबीयांसह २ ते ८ आॅगस्टदरम्यान घर बंद करून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या उत्तर बाजूकडील पत्रा उचकाटून प्रवेश करून २१ इंची टीव्ही, सेटटाप बॉक्स व मिक्सर अशा एकूण ४ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. जाधव कुटुंबीय घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस नाईक जे.एम. चौगुले करीत आहेत.
ओझर शिवारात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:23 IST