मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीपूर्वीच शासन निर्णयांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 13:14 IST2020-09-26T12:59:56+5:302020-09-26T13:14:26+5:30
नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीच्या प्रारंभीच राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळीकरण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीपूर्वीच शासन निर्णयांची होळी
नाशिक : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीच्या प्रारंभीच राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळीकरण्यात आली.
नाशिकमध्ये पंचवटी येथे एका लॉन्सवर ही बैठक होत आहे. मराठा आंदोलनाची पुढील बैठक ठरविण्यासाठी आयोजित या बैठकीस खासदार संभाजी राजे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान बैठकीला सुरुवात होण्याच्या आतच राज्य शासनाने अलीकडेच मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची होळी तुषार गवळी, अमित नडगे,सुदर्शन निमसे, किशोर तिडके, सचिन पवार , अविनाश पाटील आदींनी केली.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर
समाजात उफाळून आलेला असंतोष आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेऊन दिलासा देण्याचा केलेला प्रयत्न यासंदर्भात चर्चा करून आंदोलनाची पुढिल दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.