शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’

By अझहर शेख | Updated: March 20, 2019 13:58 IST

या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देहोळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा

अझहर शेख, नाशिक :होळी’निमित्तनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, इगतपुरी आदि आदिवासीबहुल वनपरिक्षेत्रांमध्ये नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाकडून ‘अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने या भागातील जंगलांमध्ये चोख गस्त घालण्याचे आदेश वनरक्षकांना देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने वनक्षेत्र आदिवासी जिल्ह्यांमध्ये टिकून आहे. या भागातील जंगलसंवर्धन आदिवासी जनतेच्या मदतीने वनविभागाकडून केले जात आहे. ‘होळी’चा सण आदिवासी संस्कृतीती मोठा सण मानला जातो. या सणाला आदिवासी बांधवांकडून मोठा उत्सव साजरा होतो. या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. होळीचे निमित्त करून वनक्षेत्रात घुसखोरी करत वृक्षतोड करताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच होळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा होत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर वनांचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यावर वनविभागाकडून भर दिला जात आहे.संपुर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास ३ हजार ४३० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर वने टिकून आहेत. त्यापैकी वनविभागाच्या एकूण वनक्षेत्र ३ हजार १९२ चौरस किलोमीटर इतके आहे. यामध्ये संरक्षित वन क्षेत्र, राखीव वने, संरक्षित क्षेत्राचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याची पुर्व-पश्चिम अशी विभागणी वनविभागाने तालुकानिहाय केली आहे.वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांनी वैयक्तिक सहभाग घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वने टिकली तर पृथ्वी टिकेल...

वनांचे अस्तित्व सजीवसृष्टीसाठी महत्त्वाचे आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या जोपासणेसाठी वने टिकविणे ती वाढविणे काळाची गरज आहे. कारण वने टिकली तर पर्जन्यमानाचे प्रमाण संतुलन टिकून राहील आणि वनोपजाच्या माध्यमातून उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लागेल तसेच वन्यप्राण्यांची जैवविविधता जोपासण्यास मदत होईल. चांगल्या पर्जन्यमानासाठी तसेच नदी, नाले, आहोळ वाहते ठेवण्यासाठी आपआपल्या भागातील वनांचे रक्षण करणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. वनाच्छादित प्रदेश कसा वाढविता येईल, या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड व संवर्धनावर भर देण्याची गरज आहे.---नाशिक जिल्ह्याची जैवविविधता समृध् व सक्षम करण्यासाठी वन संरक्षण करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास वने संरक्षित नसल्याचे संकेत देणारा आहे. त्यामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष वाढण्यास मदत होत आहे. वने टिकली तर त्या वनांमध्ये वन्यप्राण्यांची गुजराणसाठी लागणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होईल, आणि त्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास कुठेतरी थांबेल. नागरिकांनी कुºहाडबंदी, शिकारबंदी, चराईबंदीसह अतिक्रमणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. जंगलात स्वार्थापोटी आगी लावू नयेत. तसेच वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, एवढेच आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. जंगलाला आगी लावण्याचे प्रकार टाळावे, अतिक्रमणांपासून दूर रहावे, वेळ लागणार.- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम भागशासनाच्या ३३कोटी वृक्ष लागवड संवर्धन अभियानात जनतेने वैयक्तिक सहभाग वाढवावा. जेणेकरून वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल. आपआपल्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करावे. सभोवताली अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. वनांचा सांभाळ ही केवळ शासनाची किंवा वनविभागाची जबाबदारी नसून जनतेचीदेखील जबाबदारी आहे. वनांचा फायदा सर्वांगिण सजीवसृष्टीला होत असतो, हे लक्षात घ्यावे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक नाशिक पुर्व भाग 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागHoliहोळी