सिन्नरला वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:18 IST2020-07-04T20:35:16+5:302020-07-04T23:18:38+5:30
सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना योग्य रक्कमेची बिले देण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सिन्नर येथे भाजपाकडून वाढीव वीजबिलांची होळी करतांना बाळासाहेब हांडे, दत्तात्रय गोसावी, सोनल लहामगे, सजन सांगळे आदी.
सिन्नर : लॉकडाउन उठल्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या बिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाच्यावतीने महावितरण च्या आडवा फाटा येथील कार्यालयासमोर वाढीव वीजिबलांची होळी करुन ग्राहकांना योग्य रक्कमेची बिले देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृृत्वाखाली पदाधिकारी व ग्राहकांनी महावितरणचे शाखा अभियंता यांना निवेदन देऊन वाढीव बिलांची होळी करण्यात आली. याप्रसंगी सचिन गोळेसर, अजित शेख, सागर मुत्रक, आदित्य पांडे, नितीन सरोदे, चंद्रकला सोनवणे, अनिता काकड, जीजाबाई सोनवणे, अलका बैरट आदी पदाधिकारी उपस्थित होते.