पिंपळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांकडून वीजबिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:14 IST2020-11-23T23:56:15+5:302020-11-24T02:14:56+5:30

पिंपळगाव बसवंत : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले.

Holi of electricity bills from BJP workers at Pimpalgaon | पिंपळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांकडून वीजबिलांची होळी

पिंपळगाव शहरात वाढीव वीजबिलांची होळी करताना भाजपचे अल्पेश पारक, सतीश मोरे ,भागवत बोरस्ते आदी.

ठळक मुद्देया आंदोलनास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपळगाव बसवंत : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती निफाड फाट्यावर झालेल्या या आंदोलनास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात भाजपचे महाराष्ट्र अल्पसंख्याकचे प्रदेश चिटणीस आल्पेश पारख, भागवत बोरस्ते, भाजप युवा मोर्चाचे सतीश मोरे, डॉ. सारिका डेरले, सचिन दराडे, संजय गाजरे, प्रशांत घोडके, शीतल बुरकुले, दत्तू मोरे, गोविंद कुशारे, संदीप झुटे, चिंधु काळे, स्वप्निल लोढा, पगारिया वकील, प्रकाश घोडके, पवन जाधव, गोरख गांगुर्डे, अरबाज पठाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 

Web Title: Holi of electricity bills from BJP workers at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.