होळी सणावर महागाईचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 09:53 PM2020-03-08T21:53:03+5:302020-03-08T21:54:35+5:30

त्र्यंबकेश्वर : यंदा होळी तथा शिमगा सणावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. होळी सणात हारकडी वगैरे साखरेच्या पाकात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय होळी सण साजरा करण्यासाठी करण्यात येणाºया गोडधोड पदार्थांसाठी लागणाºया वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सणाचा गोडवा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Holi celebrates inflation! | होळी सणावर महागाईचे सावट !

होळी सणावर महागाईचे सावट !

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : किमतीत वाढ झाल्याने गोडवा कमी होण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : यंदा होळी तथा शिमगा सणावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. होळी सणात हारकडी वगैरे साखरेच्या पाकात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय होळी सण साजरा करण्यासाठी करण्यात येणाºया गोडधोड पदार्थांसाठी लागणाºया वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सणाचा गोडवा कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
साखर ३८ रुपये, गूळ ५० रुपये, हरबरा डाळ याशिवाय गहू, तूप, तेल, तांदूळ आदी मालाचेदेखील दर वाढल्याने सणाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाने अतिवृष्टीने बळीराजाचा भ्रमनिरास केला. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे खरीप हाती आला नाही. आता रब्बीचीही तीच तक्रार असल्याने होळीसारखे सण कसे साजरे करावे हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्र्यंबकेश्वर शहर व परिसरातील खेडोपाड्यात शिमगा सणाची तयारी सुरू झाली आहे, परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. गूळ, तेल, गॅस महाग झाल्याने सणाच्या गोडव्यात कडूपणा येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.दक्षता घेणे गरजेचे१ ग्रामीण भागात शिमगा म्हटले की उत्साह असतोच त्यात वसंतोत्सव मंगळवापासून (दि.१०) सुरु होत आहे. म्हणजे अधिक उधाण सोमवारी कोकट होळी, तर मंगळवारी धुलीवंदन तर, येत्या शुक्रवारी (दि.१३) रंगपंचमी आहे. रंगपंचमीला रंग न उधळता पाकळ्यांची उधळण करावी, असे संदेश सोशल मीडियावर दिसत आहे. रंग उधळताना रंगाचा बेरंग न होता रंग उधळा पण प्रेमाने, अशी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. २ होळी पूजन करून वाईट विचाराचे दहन करावे तर धुळवडला होळीचे भस्म कपाळी लावावे, धुळवडला दुपारी दाजिबा वीर मिरविण्याची काही घराण्यांची परंपरा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर मानाची होळी पेटविली जाते. पोलीस यंत्रणेने शिमगा सणासाठी बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Holi celebrates inflation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.