शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून उलगडणार एसटीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:15 IST

गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून, सदर रथ मंगळवारी (दि.३०) जुने सीबीएस येथे येणार आहे.

नाशिक : गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्या ‘वारी लाल परीची’ प्रवाशांना दिली जात असून, सदर रथ मंगळवारी (दि.३०) जुने सीबीएस येथे येणार आहे.एस.टी.च्या निर्मितीला ७१ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी सेवेत वेळोवेळी केलेले बदल आणि दिलेल्या सुविधा याविषयीचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील प्रमुख ५० शहरांमधून परिवहन महामंडळाचे हे प्रदर्शन फिरविले जाणार आहे.बदलांचा इतिहास सांगणारी क्षणचित्रे व ‘वारी लाल परीची’ असे घोषवाक्य असलेला महामंडळाचा चित्ररथ दि. ३० रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे, तर दि. ३१ रोजी मालेगाव येथे या रथाचे आगमन होणार आहे.भारतातील सर्वात मोठ्या प्रवासी परिवहन सेवेची माहिती जनतेला मिळावी, यासाठी सदर रथ महामंडळाने तयार केला आहे. मागील काही वर्षांमध्ये बससेचा आकार, रंगसंगती आणि अंतर्गत रचनेत अनेक बदल करण्यात आलेले आहेत.लाल पिवळ्या बसेसपासून ते शिवशाही आणि बसस्थानकांपासून ते बसपोर्ट असा मोठा पल्ला गाठणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास या प्रदर्शनातून उलगडणार आहे. या प्रदर्शनात जुन्या बसेसची छायाचित्रे, माहिती फळक, जुनी स्थानके, तिकिटे, आदींची सचित्र माहिती मांडण्यात येणार आहे.सदर प्रदर्शनाचा लाभ नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे. सदर प्रदर्शनासाठी शाळांनादेखील पाचारण करण्यात आले असून, अनेक शाळांचे विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे. प्रदर्शन दिवसभर सुरू राहणार असल्याने नाशिककरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील मैंद यांनी केले आहे.प्रदर्शनातून माहितीसदर प्रदर्शन मंगळवारी (दि.३०) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत जुने सीबीएसवर भरविण्यात येणार आहे, तर दि. ३१ रोजी याच वेळेत मालेगावातील नवीन बसस्थानकात सदर प्रदर्शन भरविले जाणार आहे. एसटीची निर्मिती आणि प्रवासी सेवेतील स्थित्यंतरे, स्पर्धेला तोंड देत असताना करण्यात आलेले बदल आणि सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती या प्रदर्शनातून प्रवाशांना मिळणार आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक