हिरे कनिष्ठ महाविद्यालयास स्क्वॅश स्पर्धेत दुस-यांदा अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:57 IST2018-09-03T18:54:24+5:302018-09-03T18:57:43+5:30

Hiray Junior College second championship in squash | हिरे कनिष्ठ महाविद्यालयास स्क्वॅश स्पर्धेत दुस-यांदा अजिंक्यपद

हिरे कनिष्ठ महाविद्यालयास स्क्वॅश स्पर्धेत दुस-यांदा अजिंक्यपद

ठळक मुद्देविभागीय स्पर्धेत धडक जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल शेलार याने हा विक्रम केला

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल शेलार या विद्यार्थ्याने स्क्वॅश स्पर्धेत सलग दुस-यांदा अजिंक्यपद पटकावून विभागीय स्पर्धेत धडक मारली.
शालेय शिक्षण क्रीडा विभाग, युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित नाशिक महानगरपालिका जिल्हास्तरीय स्पर्धेत साहिल शेलार याने हा विक्रम केला.
त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे, उपप्राचार्य डॉ. अरूण पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. झाल्से, पर्यवेक्षिका प्रा. सुचेता सोनवणे, क्रीडा शिक्षक प्रा. किशोर राजगुरु यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Web Title: Hiray Junior College second championship in squash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.