हिंगणवेढे उपसरपंचपदी धात्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:54 IST2019-12-17T23:05:32+5:302019-12-18T00:54:10+5:30

हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग सूर्यभान धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Hinganweda vice-presidential candidate | हिंगणवेढे उपसरपंचपदी धात्रक

हिंगणवेढे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग धात्रक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सरपंच सुमन धात्रक, ग्रामसेविका अनिता धनराळे, ग्रामपंचायत सदस्या लता आव्हाड, वाल्मीक धात्रक, संतोष धात्रक.

एकलहरे : हिंगणवेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग सूर्यभान धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच वाल्मीक जयवंत धात्रक यांनी मुदत संपण्यापूर्वीच उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामसेविका अनिता धनराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सुमन राजाराम धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

Web Title: Hinganweda vice-presidential candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.