नाशिक : महानगरपालिकेच्या महापौरपदीभाजपाच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडणुकीत परस्परांविरोधात लढलेले हे दोन पक्ष आता सत्तेत एकत्र आले आहे. महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली.
महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाचाच महापौर होणार हे निश्चित होते. जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत महापौर व उपमहापौर यांची निवड प्रक्रिया पार पडली. १३ मार्च २०२२ रोजी नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीला सुरुवात झाली होती.
तब्बल सुमारे चार वर्षानंतर आता पुन्हा लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीमुळे महापालिकेचा कारभार पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती आला असून, शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयात तसेच महापौरांचा बंगला असलेल्या रामायण बंगल्यावर नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
Web Summary : Himgauri Adke of BJP became Nashik's mayor, and Vilas Shinde deputy. Rivals now united in power after the election. Public celebration marked the occasion.
Web Summary : भाजपा की हिमगौरी आडके नाशिक की महापौर और विलास शिंदे उपमहापौर बने। चुनाव में प्रतिद्वंद्वी, अब सत्ता में एकजुट। नागरिकों ने उत्सव मनाया।