अपहृत महिलांची पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:21 IST2018-09-20T00:21:13+5:302018-09-20T00:21:40+5:30

हरियाणा राज्यातील एका खेड्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन महिला व एका लहान मुलाची सरकारवाडा पोलिसांनी सुटका केली असून, अपहरणकर्ता संशयित अमोल सिंग यास अटक केली आहे़

Hijacked women have been released by the police | अपहृत महिलांची पोलिसांनी केली सुटका

अपहृत महिलांची पोलिसांनी केली सुटका

नाशिक : हरियाणा राज्यातील एका खेड्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन महिला व एका लहान मुलाची सरकारवाडा पोलिसांनी सुटका केली असून, अपहरणकर्ता संशयित अमोल सिंग यास अटक केली आहे़  सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील कैथल येथील चौघा इसमांनी पोलीस ठाण्यात येऊन सांगितले की, संशयित अमोल सिंग याने साथीदाराच्या मदतीने दोन महिला व मुलाचे अपहरण करून नाशिकला आणले आहे़ या इसमांनी अपहृत महिला व मुलाचे फोटोही दिले़ त्यानुसार पोलीस निरीक्षक रोहोकले, सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक नारखेडे, राठोड, पोलीस हवालदार गावित, देशपांडे, सहाणे, कोल्हे, शिंदे, वाघ, पोलीस शिपाई पवार, सोनवणे यांनी शहरातील बसस्थानके, रेल्वेस्टेशन आदी परिसरात शोध सुरू केला असता जिल्हा रुग्णालयाजवळ संशयित सिंग आढळून आला़

Web Title: Hijacked women have been released by the police