उमराणेत टमाट्याला सर्वोच्च ७५१ रूपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:58 IST2020-08-25T18:57:07+5:302020-08-25T18:58:29+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २४) करण्यात आला.

The highest price of Rs | उमराणेत टमाट्याला सर्वोच्च ७५१ रूपये दर

उमराणे बाजार समितीत टमाटा लिलाव शुभारंभाप्रसंगी टमाटा क्र ेट्सचे पूजन करताना सुजेय पोटे, नितीन जाधव, तुषार गायकवाड, शेतकरी व व्यापारी.

ठळक मुद्देबाजार समितीत टमाटा लिलावाचा शुभारंभ : पहिल्याच दिवशी ४०० क्रे ट्ची आवक

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते सोमवारी (दि. २४) करण्यात आला.
येथील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार माल खरेदी-विक्र ी होत असल्याने कांदा व मका विक्र ीसाठी शेतकऱ्यांना ही बाजार समिती उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उमराणे बाजार समितीत डाळींब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापूर्वी डाळींब लिलाव सुरू करण्यात आला. त्यानंतर लगेचच भाजीपाला लिलाव सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला असून, सर्वप्रथम टमाटा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. बाजार आवारात विक्र ीसाठी आलेल्या टमाटा क्रे ट्सचे पूजन प्रशासक पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार आवारात पहिल्याच दिवशी सुमारे ४०० क्रे ट्स टमाटा विक्र ीसाठी दाखल झाले होते. येथील शेतकरी नितीन खैरनार या शेतकºयाच्या टमाटा क्रे ट्सला (२० किलो) सर्वोच्च ७५२ रु पये दर मिळाला. टमाटा उत्पादक शेतकºयांनी प्रतवारी करून माल विक्र ीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहाय्यक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उमराणे बाजार समितीत कांदा, भुसार व डाळींब मालाबरोबरच भाजीपाला लिलावही सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी बांधवांनी बाजार समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने टमाटा लिलाव सुरू करण्यात आला आहे.
- नितीन जाधव, सचिव, बाजार समिती, उमराणे

उमराणेसह परिसरात टमाटा उत्पादक शेतकºयांची संख्या बºयापैकी आहे. परंंतु माल विक्र ीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने टमाटा विक्र ीसाठी शेतकºयांची हेळसांड होत होती. उमराणे बाजार समितीने टमाटा लिलाव सुरू केल्याने ही हेळसांड थांबली आहे.
- नितीन करणार, टमाटा उत्पादक शेतकरी.

Web Title: The highest price of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.