शहरात आज कोरोना रूग्णांचा उच्चांक ; दिवसभरात आढळले ११६ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:37 PM2020-06-18T22:37:44+5:302020-06-18T22:39:44+5:30

लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले.

The highest number of corona patients in the city today; 116 coronaviruses were found during the day | शहरात आज कोरोना रूग्णांचा उच्चांक ; दिवसभरात आढळले ११६ कोरोनाबाधित

शहरात आज कोरोना रूग्णांचा उच्चांक ; दिवसभरात आढळले ११६ कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देआकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झालासर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण कोरोनाचे वाढते थैमान हा प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय

नाशिक : शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. यामुळे नाशिककरांनी अधिक सतर्क होऊन स्वत:ला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. गुरूवारी (दि.१८) रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालय व महापालिका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालांनुसार शहरात नवे ११६ कोरोेनाबाधित आढळून आले. तसेच उपचारार्थ दाखल दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यूही झाला.
लॉकडाऊन शिथिल होताच महापालिका हद्दीतील विविध उपनगरीय भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढू लागले. दिवसभरात आतापर्यंत ६५ रूग्ण आढळून येण्याचा उच्चांक होता; मात्र गुरूवारी कोरोनाबाधितांचा आकडा थेट शंभरीपार म्हणजेच ११६ इतका झाला. यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनालादेखील धक्का बसला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असुनही या आजाराचे संक्रमण थांबता थांबत नसल्याने आश्चर्य अन् चिंताही व्यक्त होत आहे. नाशिक महापालिका हद्दीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लवकरच एक हजारीवर पोहचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गुरूवारी रात्रीपर्यंत शहराचा अतापर्र्यंतचा कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९७७ इतका झाला तर एकूण ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४०४ रूग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ५२५ रूग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.
शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे वाढते थैमान हा मनपा आरोग्य प्रशासनाचा मोठा चिंतेचा विषय बनत चालला आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे? हा यक्ष प्रश्न झाला आहे. सातत्याने पंचवटी, जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत रूग्ण आढळून येत आहे. गुरूवारी मखमलाबाद-१, पेठफाटा-१, पेठरोडवरील रामनगरमध्ये ११ तर पेठरोडवरील अन्य भागात १५ आणि याच परिसरातील ओमनगरमध्ये-४ दत्तनगरमध्ये१४ फुलेनगर-२ वैशालीनगर-१ भराडवाडी-३ , म्हसरूळचे कलानगर- ३ मेरी कॉलनी-१, शांतीनगर-१, गजानन अपार्टमेंट, तवलीफाटा-१, वृंदावन कॉलनी-१, टिळकवाडी (आरटीओ)-१, म्हाडा कॉलनी-५ तर जुने नाशिकमधील कथडा-३, अमरधामरोड-१, खडकाळी-८, कोकणीपुरा-२, जुने नाशिक-३, चौकमंडई-१, शालिमार-१, गंजमाळ-२, पखालरोड-१, वडाळारोड-२, भारतनगर-१, इंदिरानगर-१, राजीवनगर-१, दिपालीनगर-१, बोधलेनगर-२, वैद्यनगर (पोर्णिमा स्टॉप)-१, गंगापूररोडवरील सावरकरनगर-१, राका कॉलनी-१, संभाजी चौक-१, उंटवाडी-१, औदुंबर स्टॉप (सिडको)-२, बाजीप्रभू चौक (सिडको)-१, उत्तमनगर-१, कामटवाडा-१, शिवाजीनगर (सातपूर)-१,
उपनगर-१, पंजाब कॉलनी (ना.रोड)-१, पवारवाडी (ना.रोड)-१, विहितगाव-१, गोसावीवाडी-१, शिंगवेबहुला (दे.कॅम्प)-१ अशा सर्व भागात रूग्ण मिळून आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून शाळकरी मुलांपर्यंतचा समावेश आहे. एकूणच शहरातील सर्वच वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येते. यावरून असे दिसते की नाशिक शहराने कोरोना रूग्णांच्या बाबतीत मालेगावलादेखील मागे टाकले आहे.
 

Web Title: The highest number of corona patients in the city today; 116 coronaviruses were found during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.