शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

उच्चांकी तपमानाने उन्हाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:29 IST

सिन्नर : तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली काहिली होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते.कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो

सिन्नर : तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली काहिली होत असल्याचे चित्र आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाºयांच्या प्रमाणातही घट होत आहे. दुचाकी चालविणारे सनकोट, टोप्या, हातमोजे घालून फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला थंड पेय, सरबते पिण्यासाठी आणि टरबुजाच्या गार गार फोडी खाण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. तपमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना गरम होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर छतावर गरगरणारे पंखे गरम हवा फेकत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना घराबाहेर झोपण्याची वेळ आली आहे.भारनियमनामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. शेतकरी लवकर शेतात जाऊन दुपारपर्यंत कामे उरकून सावलीचा आधार घेतात, तर जनावरे चारणाºया गुराख्यांना कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो. महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाºया ग्रामस्थांना मात्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तपमानामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असून, त्यामुळे अनेक आजार बळावल्याचे दिसून येते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसत आहे.तपमानाचा पारा चढलावैशाख महिना सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील तपमानाचा पारा चढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सकाळी शहर व ग्रामीण भागात दिसणारी गर्दी दुपारी १२ वाजेनंतर कमी होते. उन्हाच्या दाहकतेमध्ये अचानक वाढ झाल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते.