आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:33 PM2020-07-29T23:33:35+5:302020-07-30T01:45:37+5:30

नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.

The high jump of a suicidal farmer's daughter | आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कन्येची उंच भरारी

Next
ठळक मुद्दे‘आकांक्षा’पुढती गगन ठेंगणे : आधारतीर्थ आश्रमातील आकांक्षा पवारने मिळविले यश

धनंजय रिसोडकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा मोर्चा आंदोलनाचा आवाज बनलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कन्या आकांक्षा दिनेश पवार हिने दहावीच्या निकालातही तिच्या हुशारीची चुणूक दाखवत ८५ टक्के मिळवले. वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर गत १४ वर्षांपासून ती त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमात राहात आहे. बालवाडीपासून इथेच शिकलेल्या आकांक्षासह आत्महत्याग्रस्त बळीराजाच्या ६ मुलांनी दहावीत यशाचा झेंडा फडकवला आहे.
आकांक्षाचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळानजीकचे टोळी हे होते. मात्र, आकांक्षा २ वर्षांची असतानाच तिचे वडील दिनेश पवार यांनी सावकार आणि बॅँकेच्या कर्जाच्या दबावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ आईने विहिरीत उडी घेऊन जीव दिल्याने आकांक्षा बालपणीच अनाथ झाली होती. अशा परिस्थितीत जवळचे नातेवाईक तिला सांभाळायला फारसे उत्सुक नसल्याने गावच्या सरपंचांनी आकांक्षाला त्र्यंबकेश्वरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आधारतीर्थ आश्रमात आणून सोडले होते. तेव्हापासून आधारतीर्थ आश्रमातच आकांक्षाचे पालनपोषण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलांचे गुणसप्तकत्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील आहेत. त्यातील यंदा दहावीत असलेली ही सातही मुले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून, त्यांनी मिळवलेले गुण आणि जिल्हा पुढीलप्रमाणे- आकांक्षा पवार (८४.५० टक्के, जळगाव), विद्या महाले (७९ टक्के ), चेतन फौजदार (७०.६० टक्के, अहमदनगर), बाळकृष्ण घारे (६८.६० टक्के, ठाणे), यशोदा चौधरी (६३ टक्के, औरंगाबाद), ओमकार लांडगे (६०.६० टक्के, सोलापूर), सुनीता डबके (५३.२० टक्के, यवतमाळ) शाळेपर्यंत पायी प्रवासत्र्यंबकेश्वरनजीक असलेल्या आधारतीर्थमधील सर्व मुले तळवाडे गावातील जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. आधारतीर्थपासून हे अंतर ५ किलोमीटर लांब असून, दररोज सर्व मुले हे अंतर चालत जातात. या मुलांप्रमाणेच आकांक्षानेही शाळेत पायी जात यश मिळविले आहे.

Web Title: The high jump of a suicidal farmer's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.