अबॅकस स्पर्धेसाठी हर्षल बच्छावची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:25 IST2020-01-08T23:24:35+5:302020-01-08T23:25:04+5:30

केबीएच विद्यालयातील विद्यार्थी हर्षल बाजीराव बच्छाव याने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

Herschel Bachchan's selection for the Abacus tournament | अबॅकस स्पर्धेसाठी हर्षल बच्छावची निवड

अबॅकस स्पर्धेसाठी निवड झालेल्या हर्षल बच्छावचा सत्कार करताना प्राचार्य अनिल पवार. समवेत एस. पी. सावंत, श्रीमती एस. एन. शेख आदी.

मालेगाव : येथील केबीएच विद्यालयातील विद्यार्थी हर्षल बाजीराव बच्छाव याने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची मलेशिया येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक एस. पी. सावंत, पर्यवेक्षिका एस. एन. शेख, संजय सूर्यवंशी, महेश देसले, एम. पी. पवार यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी डी. डी. शिरोळे, के. जे. निकम, श्रीमती डी. जे. जाधव, रोहिणी ठोके, मनीषा आहेर, अर्चना हिरे, ए. डी. निकम आदि उपस्थित होते.

Web Title: Herschel Bachchan's selection for the Abacus tournament