गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:40 IST2021-02-23T20:45:57+5:302021-02-24T00:40:45+5:30

लखमापूर : दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्हा परिषद शाळा वणी येथे भेट दिली असता तेथील स्वयंपाकी मदतनीस महिलेला काही प्रश्न विचारले तेव्हा त्या महिलेला ऐकू येत नसल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत त्यांनी त्या महिलेला लोकसहभागातून २० हजार रुपये किमतीचे श्रवणयंत्र मिळवून दिले.

The helping hand of the group education officer | गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

ठळक मुद्देमहिलेला श्रवणयंत्र तत्काळ उपलब्ध करून दिले.

लखमापूर : दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी जिल्हा परिषद शाळा वणी येथे भेट दिली असता तेथील स्वयंपाकी मदतनीस महिलेला काही प्रश्न विचारले तेव्हा त्या महिलेला ऐकू येत नसल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत त्यांनी त्या महिलेला लोकसहभागातून २० हजार रुपये किमतीचे श्रवणयंत्र मिळवून दिले.

वणी केंद्रातील वणी शाळेत गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी शैक्षणिक गुणवत्ता तपासणीकामी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला प्रश्न विचारले असता महिला हावभाव करून उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती, त्यामुळे सुसंवाद होत नव्हता. विशेष शिक्षक समाधान दाते यांनी ही बाब हेरली, त्या महिलेला श्रवणयंत्र उपलब्ध करून दिल्यास तिला ऐकू येईल ही बाब गटशिक्षणाधिकारी कनोज यांच्या निदर्शनास आणून दिली. क्षणाचाही विलंब न करता कनोज यांनी मदतीचा हात पुढे केला व महिलेला श्रवणयंत्र तत्काळ उपलब्ध करून दिले.

Web Title: The helping hand of the group education officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.