पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:39 AM2019-08-27T00:39:45+5:302019-08-27T00:40:12+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सिएट कंपनीच्या कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

 A helping hand for flood victims | पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

Next

नाशिक : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सिएट कंपनीच्या कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सातपूर येथील सिएट एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने शुक्रवारी (दि.२३) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश दिला आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन नितीन दवे, युनियन अध्यक्ष भिवाजी भावले, सचिव कैलास धात्रक, सोसायटीचे सचिव अंकुश कोडग, उपाध्यक्ष राजाराम इखे, सहसचिव सागर शिंदे, खजिनदार भरत सांगळे, संचालक दशरथ चौबे, संचालक अरुण लांडगे, संचालक योगेश दोंदे, संजय रासकर यांच्यासह सोसायटी सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
भगर मिलतर्फे पूरग्रस्तांना मदत
भगर मिल असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्थ लोकांना मदतीचा हात पुढे क रून दोन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला असून, सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोंडाईचा येथे सुपुर्द क रण्यात आला. यावेळी अध्यक्ष महेंद्र छोरिया, उपाध्यक्ष उमेश वैश्य, अशोक साखला, दीपक राठी आदी उपस्थित होते.
छायाचित्रकार संघटनेच्या वतीने
पूरग्रस्तांसाठी मदत
नाशिक : छायाचित्रकार संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत प्रबोधनपर संदेश पदयात्रा एक आगळा वेगळा असा उपक्रम राबविण्यात आला. छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर, सांगली, नाशिक येथील पूरग्रस्तांसाठी प्रबोधनपर संदेश पदयात्रचे आयोजन करण्यात आले होते.
पूरग्रस्तांसाठी प्रबोधनपर संदेश देणारे फलक छायाचित्रकारांनी हाती घेतले होते . तसेच राजेबाहद्दर हॉस्पिटलच्या वतीने डॉ. शालमली इनामदार तसेच डॉ.संदीप राजेबाहद्दर यांनी सभासदांना हेल्थअवेरनेस वर मार्गदर्शन केले .तसेच संघटनेचे ज्येष्ठ छायाचित्रकार सभासद दिलीप येलमामे यांनी योगा विषयी माहिती दिली.
महाराष्ट्र फोटोग्राफी असोसिएशन चे अध्यक्ष गणेश घरत. छायाचित्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे, पंकज अहिरराव, सुरेंद्र पगारे, नंदू विसपुते, रवींद्र सूर्यवंशी, कैलास निरगुडे, प्रशांत तांबट, राज चौधरी, धनराज पाटील व संघटनेचे सभासद उपस्थित होते.
विद्याप्रबोधिनी प्रशालेची पूरग्रस्तांसाठी मदत
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन करताच दुसºया दिवशीच तांदूळ, तूरडाळ शाळेमध्ये जमा झाली. सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश सफल झाला. संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून हे सर्व धान्य पूरग्रस्तांना पोचविण्यात आले.
पूरग्रस्तांना
शासनाची मदत
४मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी घरात घुसून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेल्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील सुमारे सातशे कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते शनिवारी पूरग्रस्तांची भेट घेऊन धनादेश वाटप करण्यात आले. पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. शासनाच्या माध्यमातून पूरग्रस्त
नागरिकांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत करण्याचे शासनाचे आदेश असल्याने शनिवारी सकाळी पूरग्रस्त कुटुंबीयांना प्रतिकुटुंब पंधरा हजार रुपये असे सुमारे
सातशे धनादेश वाटप केले. यावेळी नगरसेवक कमलेश बोडके, मच्छिंद्र सानप,
नरेश पाटील, तलाठी कविता गांगुर्डे, मधुबाला भोरे, राजेश भोरे, सुनील महांकाळे
आदींसह नागरिक उपस्थित होते.

Web Title:  A helping hand for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.