बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST2020-08-11T22:19:54+5:302020-08-12T00:05:52+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.

चिंचलखैरे येथे आगिवले यांच्या कुटुंबीयांना मदत देताना हिरामण खोसकर
घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.
विशेष म्हणजे शनिवारी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते. पिंजरा असलेला परिसर चुकवून पुन्हा बिबट्या रात्री पाड्यावर आल्याने आदिवासींमध्येभीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना खोसकर यांनी केली. दरम्यान चिंचलेखैरे येथील परिसराची पाहणी करताना सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरकरिता वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खोसकर यांनी दिली. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, समीर साबळे, सरपंच मंगा खडके उपस्थित होते.