सौजन्य महिला संस्थेच्या वतीने अनाथाश्रमाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:13 IST2019-05-23T00:13:14+5:302019-05-23T00:13:33+5:30

सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त खंबाळे येथील श्रीमती गार्डा अनाथ बालकाश्रमात झालेल्या कार्यक्र मात मुलांना वह्या, टीफिन बॉक्स व वॉटरबॅगचे वाटप करण्यात आले.

 Help for Orphanage by Saajanya Mahila Sanstha | सौजन्य महिला संस्थेच्या वतीने अनाथाश्रमाला मदत

सौजन्य महिला संस्थेच्या वतीने अनाथाश्रमाला मदत

नाशिक : सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त खंबाळे येथील श्रीमती गार्डा अनाथ बालकाश्रमात झालेल्या कार्यक्र मात मुलांना वह्या, टीफिन बॉक्स व वॉटरबॅगचे वाटप करण्यात आले.  कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव, अ‍ॅड. अनिता जगताप, कर्नल देवीदास पोरजे, वसंत फाउंडेशनचे नंदू सानप उपस्थित होते. यावेळी सौजन्य महिला संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी यांनी प्रास्ताविकात संस्थेचे विविध उपक्र म व महिलांसाठी करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. अनाथ बालकाश्रमाचे इंजिनिअर आशीर्वाद पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शीतल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर पल्लवी पवार यांनी आभार मानले. यावेळी सीमा सांगळे, कल्याणी आहेर, पूजा सांगळे, भाग्यश्री चौधरी, आरती सांगळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Help for Orphanage by Saajanya Mahila Sanstha