पिठुंदी येथे जीवनावश्यक वस्तुंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 21:04 IST2021-03-20T21:03:44+5:302021-03-20T21:04:31+5:30

पेठ : औदुंबर भक्त मित्रमंडळ मुंबई नाका नाशिक या संस्थेकडून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंदी या गावात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

Help with necessities at Pithundi | पिठुंदी येथे जीवनावश्यक वस्तुंची मदत

पिठुंदी येथे ब्लॅकेट वाटप करताना औदुंबर भक्त मित्रमंडळाचे सदस्य व ग्रामस्थ.

ठळक मुद्देगावातील ६९ कुटुंबांना प्रत्येकी २ ब्लँकेट व ५ किलो तांदळाचे वाटप

पेठ : औदुंबर भक्त मित्रमंडळ मुंबई नाका नाशिक या संस्थेकडून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंदी या गावात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात गरजू कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी गावातील ६९ कुटुंबांना प्रत्येकी २ ब्लँकेट व ५ किलो तांदळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे भूषण काळे, किरण चौधरी, अजिंक्य ढाकणे, सागर दुसाने, दिनेश देसले, नितीन चौधरी, रामेश्वर जंगम, सिद्धेश्वर विसपुते, निखिल ढगे, सरपंच कविता चौधरी, मनोहर चौधरी, मुख्याध्यापक भाऊसाहेब बावा आदी उपस्थित होते.

 

Web Title: Help with necessities at Pithundi