लासलगाव येथे केरळ पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 14:33 IST2018-08-30T14:33:48+5:302018-08-30T14:33:58+5:30
लासलगाव : केरळ पूरग्रस्तांना येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारत भारतीय संघटना यांच्यावतीने मदत पाठविण्यात आली.

लासलगाव येथे केरळ पूरग्रस्तांना मदत
लासलगाव : केरळ पूरग्रस्तांना येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारत भारतीय संघटना यांच्यावतीने मदत पाठविण्यात आली. येथून या उपक्र मात तेरा टन गव्हाचे पिठ तसेच पंधरा टन कांदा संकलित करण्यात आले.या मदत कार्यात नुतन विद्या प्रसारक मंडळ,लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय,महावीर जैन विद्यालय सरस्वती विद्या मंदिर लासलगाव तसेच गोंदेगाव खडक माळेगाव, वनसगाव, विंचुर, लासलगाव कांदा व्यापारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. या उपक्र मात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोटू बकरे, प्रमोद खाटेकर,दत्ता पाटील, मयुर झांबरे, संदीप उगले राम बोराडे, नितीन शर्मा, विशाल सोनवणे, सुनील काळे, निर्मल शर्मा, विकी टर्ले, शुभम बोराडे, अनिल शिंदे, अजिंक्य झांबरे, शुभम नजन, हिरामन सोनवणे व इतर स्वयंसेवक उपस्थित होते. व्यवस्थापक प्रमुख म्हणून महेश चव्हाण यांनी सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने कार्य केले.