आजपासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:08 IST2019-08-27T00:07:41+5:302019-08-27T00:08:12+5:30
बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आजपासून पुन्हा हेल्मेटसक्तीची मोहीम
नाशिक : बेशिस्त वाहनचालकांवर पुन्हा शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (दि.३१) मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी पुन्हा एकदा जे दुचाकीस्वार नाशिककर हेल्मेटचा वापर करणार नाही त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली जाणार आहे. आयुक्तालय हद्दीत सर्व पोलीस ठाणेनिहाय नाक्यांवर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातात शहरात कमी झाल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा आहे. विशेषत: हेल्मेटचा वापर वाढल्यामुळे अपघाती मृत्युचे प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. मंगळवारपासून राबविल्या जाणाºया या विशेष मोहिमेत वाहतुक नियम पालनाविषयी जनजागृतीही केली जाणार आहे.