लखमापूरला जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:52 IST2021-05-30T21:35:06+5:302021-05-31T00:52:05+5:30
लखमापूर: दिंडोरी तालुक्यात रविवारी (दि. २९) पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला आहे.

लखमापूरला जोरदार पाऊस
ठळक मुद्दे तालुक्यात द्राक्षे बागांची कामे अंतिम टप्प्यात
लखमापूर: दिंडोरी तालुक्यात रविवारी (दि. २९) पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला आहे.
सध्या तालुक्यात खरीप हंगामाची कामे सुरू असून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात ब-याच ठिकाणी शेतीची नांगरणी, वखरणीआदी स्वरूपांची कामे पार पडल्याने बळीराजाला पावसांची अपेक्षा होती. सध्या तालुक्यात द्राक्षे बागांची कामे अंतिम टप्प्यात आली आहे.