जानोरी परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 00:19 IST2022-01-09T00:16:57+5:302022-01-09T00:19:27+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बदलत्या वातावरणामुळे व मुसळधार पावसाने द्राक्ष शेतीचे व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

जानोरी परिसरात मुसळधार पाऊस
ठळक मुद्दे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बदलत्या वातावरणामुळे व मुसळधार पावसाने द्राक्ष शेतीचे व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात शुक्रवारी (दि. ७) रात्री मुसळधार पाऊस पडल्याने द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच टोमॅटो, सोयाबीन, मका, वालवड, फुल शेती या पिकांचे अतोनात नुकसान होणार असल्याने जानोरी परिसरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.