इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:25 IST2020-06-07T21:38:15+5:302020-06-08T00:25:43+5:30
इगतपुरी तालुक्यात रविवारी (दि.७) मुसळधार पावसाने हजेरी लावली. कसारा घाट व पश्चिम घाट माथा परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना गारवा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस
इगतपुरी : तालुक्यात रविवारी (दि.७) मुसळधार पावसाने हजेरी लावली. कसारा घाट व पश्चिम घाट माथा परिसरात संततधार सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना गारवा मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यातील अति दुर्गम व खेड्याच्या भागात पाऊस तुफानी मारा करीत आहे. इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.