भगूर : शहरात सायंकाळी वादळी वारा आणि गारांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही घराच्या भिंतीची पडझड झाली, तर काही घरांच्या छताचे सिमेंटचे पत्रे तुटून पडले आहे.भगूर शहर व परिसरात झालेल्या या मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडून वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार पसरला होता. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमल्याने ठिकठिकाणच्या गटारीही तुंबल्या होत्या. भगूर परिसरात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक गारासह वादळी पाऊस झाल्याने भगूर-राहुरी रोडवरील सिद्धार्थ पंच मंडळ मैदानाची संरक्षक भिंत कोसळली. त्याचप्रमाणे बाजूच्या घराचेही पत्रे तुटले असून एक कडूनिंबाचे झाड उन्मळून पडले असून एक रिकामी टपरी जोराच्या वाऱ्याने दूरवर उडून गेली. दरम्यान सकाळी १० वाजता वीज मंडळाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो दुपारी ३.३० वाजता पूर्ववत झाला. परंतु पुन्हा पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
भगूरला गारांसह मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 01:03 IST
भगूर : शहरात सायंकाळी वादळी वारा आणि गारांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही घराच्या भिंतीची पडझड झाली, तर काही घरांच्या छताचे सिमेंटचे पत्रे तुटून पडले आहे.
भगूरला गारांसह मुसळधार पाऊस
ठळक मुद्दे काही ठिकाणी घरांची पडझड