गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:19 IST2018-08-14T01:19:01+5:302018-08-14T01:19:16+5:30

Heart attack shock while driving | गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका

गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका

नाशिकरोड : दत्तमंदिररोड दूरध्वनी कार्यालयाकडून स्विफ्ट डिझायरमध्ये जाणारे बांधकाम व्यावसायिक ज्ञानेश्वर गायकवाड यांची अचानक प्रकृती बिघडल्याने स्विफ्ट गाडी संरक्षित भिंतीवर जाऊन आदळल्याने गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले.
दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ च्या क्रीडांगणाजवळील सहारा हॉस्पिटलमागे राहणारे ज्ञानेश्वर तुकाराम गायकवाड (५५) हे आपल्या स्विफ्ट गाडी (एमएच १५, जीएफ ९०१९) बहीण व मेव्हण्यांसह सोमवारी सायंकाळी दत्तमंदिररोड येथून जात होते.
गाडी चालविणारे ज्ञानेश्वर गायकवाड यांना फिट येऊन हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची गाडी दूरध्वनी कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळल्याने गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले.

Web Title: Heart attack shock while driving