शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोकाटे यांच्या शिक्षेवर आता ५ मार्चला सुनावणी; हरकत घेणाऱ्यांना तीन दिवसांची मुदत

By संकेत शुक्ला | Updated: March 1, 2025 17:43 IST

१९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.

संकेत शुक्ल, नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय काेकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत राखून ठेवलेल्या निकालाची सुनावणी होण्याआधीच कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका शनिवारी (दि. १) दाखल झाल्याने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली.

आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळत ही सुनावणी ५ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. यापूर्वी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना कागदपत्र फेरफार अन् फसवणूक केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आले होते. १९९५ ते ९७ मध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याचा आरोप काेकाटे यांच्यावर आहे.

या निर्णयाला कोकाटे यांनी आव्हान देत शिक्षा स्थगितीसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत १ मार्च रोजी यासंदर्भात निकाल देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचदरम्यान शनिवारी सकाळी ॲड. सतीश वाणी आणि आशुतोष राठोड यांनी पुन्हा शिक्षेच्या स्थगितीला आदेश देणाऱ्या याचिका दाखल करीत त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांचा दाखला दिला. त्यानुसार शिक्षेची स्थगिती उठवून आ. कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवावी, ही मागणी त्यात करण्यात आली होती. मात्र, जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी स्थगिती देण्याची याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना वरिष्ठ न्यायालयात हरकत दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली. तीन दिवसांत तुम्ही उच्च न्यायालयात जा अथवा ५ मार्च रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे निकाल देत याचिका दाखल केली होती. आताही आम्हाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. आमदार आहे म्हणून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देता येणार नाही. त्याविरोधात आम्ही लढणार आहोत.-ॲड. सतीश वाणी

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस