मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 14:19 IST2021-01-03T14:19:24+5:302021-01-03T14:19:45+5:30

नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मर्क्युरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी ...

He entered the house and extended the woman's gold chain | मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली

मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली

ठळक मुद्दे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मर्क्युरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी यांनी आपल्या पतीसोबत रात्री बारा वाजेच्या सुमारास बळजबरीेने प्रवेश करत मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. याप्रकरणी सय्यद यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात तब्बल दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी संशयित ललवाणी दाम्पत्य १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी मागील कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित पायल हिने त्यांना हाताच्या चापटीने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी सय्यद कुटुंबियांनी मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. यावेळी तत्काळ गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल, सहायक निरिक्षक बैसाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना समज देत घटनास्थळावरुन हाकलून दिले होते. यानंतर पिडित सय्यद यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पायलविरुध्द गुन्हा दाखल केला. यापुर्वीही संशयित पायलविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.

Web Title: He entered the house and extended the woman's gold chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.