तरुणास मारहाण करुन मोबाइल पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:32 IST2018-09-10T01:32:25+5:302018-09-10T01:32:42+5:30
कॅम्प रोडवरील इदगाह मैदानावर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणास दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील रोकड व १२ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच चोरून नेला.

तरुणास मारहाण करुन मोबाइल पळवला
मालेगाव : येथील कॅम्प रोडवरील इदगाह मैदानावर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणास दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील रोकड व १२ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच चोरून नेला. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अबरार अन्सारी सुकरूल्ला अन्सारी (२२), रा. बादशाह खाननगर, स. नं. १०, द्याने याने कॅम्प पोलिसात फिर्याद दिली. तो ईदगाह मैदानात फिरण्यास गेला असता दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएच १७१० वरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी यहा क्या कर रहा है असे म्हणून त्याला मारहाण केली. त्याच्या खिशातील १२ हजारांचा भ्रमणध्वनी संच हिसकावून पळून गेले. अधिक तपास उपनिरीक्षक घुगरकर करीत आहेत.