शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात

By suyog.joshi | Updated: October 20, 2023 14:55 IST

ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार

नाशिक (सुयोग जाेशी) : स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रजांची देवभूमी आता ड्रग्जमाफियांची भूमी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नशेत बुडाला असून आजचा मोर्चा म्हणजे नाशिककरांसाठी लढाई असल्याचे सांगत नाशिकच्या पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का? असा घणाघात शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शुक्रवारी ड्रग्जविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना राऊत यांनी शिष्टमंडळासह निवेदन दिले. मोर्चात मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चात ‘पालकमंत्री वाचवा, अंमली पदार्थ बंद करा, पालकमंत्री हटाव, नाशिक बचाव’ घोषणा देत वातावरण दुमदुमून सोडले. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले, शिवसेना नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरली आहे. नाशिकला ड्रग्जमाफिया बनविणाऱ्या सरकारविरोधात आमचा आक्रोश असून इकडे आमचा मोर्चा सुरू असताना तिकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेत आहेत. वास्तविक पाहता फडणवीस यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. परंतु ते तेथे पत्रकार परिषद घेत बसले. ड्रग्जप्रकणी सरकार गांभिर्याने विचार करत नाही. ताेपर्यंत सरकारला आम्ही सोडणार नाही असा इशारा देत राऊत म्हणाले, ड्रग्जप्रकरणात गृहमंत्री, पालकमंत्री राजकारण करत आहे. ड्रग्जप्रकरणात कोणाला किती खोके दिले जातात याचा सर्व हिशोब पालकमंत्र्यांना माहिती आहे. पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का असा प्रश्न विचारत या मालेगावच्या कुत्ता गोळीचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राऊत यांनी दिला.

उद्धव, आदित्य ठाकरे यांचा फाेनसकाळी शिवसेना नेते उद्वव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोन येऊन गेला. ते म्हणाले, आपल्याला नाशिक वाचवायचे आहे. ही लढाईची सुरूवात आहे. त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. आपल्याला ड्रग्जविरोधात लढा द्यायचा आहे. त्यामुळे ही निकराची लढाई लढण्यासाठी प्रत्येकाने तयार राहावे असे आवाहनही त्यांनी केले.मोठ्या भाभीला १५ लाखांचा हप्ताछोट्या भाभीला अटक केली. मग १५ लाखांचा हप्ता घेणाऱ्या मोठ्या भाभीचे काय? असा प्रश्न विचारत राऊत यांनी ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके मंत्र्यांना दिली जातात याचा तपास करा. नाशिकची तरूणपिढी या ड्रग्जपायी वाया जात असून ड्रग्जमाफियांकडून नाशिक शहराचा नाश होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतDrugsअमली पदार्थ