शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

हरसूल दंगलीतील आरोपींना कोठडी

By admin | Updated: July 20, 2015 23:56 IST

कारवाई : उर्वरित आरोपींना आज हजर करणार

 

नाशिक : हरसूल आणि ठाणापाडा येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या ९० आरोपींपैकी ४३ संशियतांना आज न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली. दरम्यान, हरसूल आणि ठाणापाडा येथील जनजीवन आता पूर्वपदाकडे येत असून, दैनंदिन व्यवहार सुरु ळीत होत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.युवकाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल न करता आकस्मिक मृत्यूची नोंद करून संशियतांना पोलीस पाठिंबा देत असल्याचा आरोप करीत हरसूलवासीयांनी दि. १४ रोजी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागल्याने हरसूलमध्ये दंगल उसळली होती. त्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यूही झाला, तर गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर कडक कारवाई करीत पोलिसांनी दंगलीत सहभागी झालेल्यांवर खुनाचा प्रयत्न, दंगल पसरवणे, जाळपोळ, लूटमार आदि गुन्हे दाखल केले होेते. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारपासून ९० हून अधिक नागरिकांना अटक केली होती. त्यांतील सुमारे ४३ संशियतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २०) पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा एस. जे. भोर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु ती नाकारत न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालीन कोठडीत केल्याने वैद्यकीय चाचणी करून त्यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले. गृहराज्यमंत्र्यांनी संशियतांवर कठोर कारवाईचा इशाराही दिल्याने दंगलग्रस्त भागात शांतता आहे. पोलिसांनी बंदोबस्त अद्याप कायम ठेवला असल्याने येथील परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे.