शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भगूरमध्ये हर्षवर्धन यांचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:57 AM

महाराष्टÑ केसरीची गदा पटकाविल्यानंतर बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे रविवारी भगूरला आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी औक्षण आणि सजविलेल्या रथातून संपूर्ण भगूर भूमीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगूरकरांच्या वतीने हर्षवर्धनचा यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देनागरी सत्कार : सजविलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक

भगूर : महाराष्टÑ केसरीची गदा पटकाविल्यानंतर बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे रविवारी भगूरला आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी औक्षण आणि सजविलेल्या रथातून संपूर्ण भगूर भूमीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगूरकरांच्या वतीने हर्षवर्धनचा यांचा नागरी सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर प्रथमच भगूरमध्ये आलेल्या हर्षवधन यांचे स्वागत करण्यात आले. भगूर बलकवडे व्यायामशाळेत हर्षवर्धन यांच्या हस्ते कुस्ती मॅट व मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रीय कोच अ‍ॅड. विशाल बलकवडे यांनी देखील पूजन केले. सायंकाळी गावातून सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथावर गोरखनाथ बलकवडे, हर्षवर्धनचे वडील मुकुंद सदगीर हे उपस्थित होते. बलकवडे व्यायामशाळेपासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले.शिवाजी चौकात आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार सरोज आहिरे, हिरामण खोसकर, सीमा हिरे, गिरीश पालवे, दीपक बलकवडे, प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, विष्णुपंत म्हेसधुने, कावेरी कासार, राजेंद्र लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. केसरी स्पर्धेत विविध गटात पदक मिळविणारे सागर बर्डे, रमेश कुकडे, धर्मा शिंदे, भाऊराव सदगीर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र मोरे यांनी केले. १९९५ मध्ये राजेंद्र लोणारी उपमहाराष्ट्र केसरी मल्ल केसरी झाला होता. मात्र हर्षवर्धनच्या रूपाने जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा गदा मिळाली, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले तर आभार प्रेरणा बलकवडे यांनी मानले. या सोहळ्याला हर्षवर्धन यांचे आई-वडील उपस्थित होते.सन्मानाने भारावला !महाराष्टÑ केसरीच्या विजेतेपदाचा सन्मान नाशिकला प्रथमच मिळवून देणाऱ्या हर्षवर्धन यांच्या स्वागतासाठी भगूरच जणू रस्त्यावर उतरले होते. ढोल-ताशाच्या गजरात रथावरील मिरवणुकीनंतर हर्षवर्धन यांनी बलकवडे व्यायाम शाळेतील हनुमानाच्या मूर्तीस नमस्कार केला़ यावेळी ते अक्षरश: भारावून गेले होता.रथातून उतरून आई-वडिलांना नमस्कारहर्षवर्धन यांच्या आगमनानंतर बलकवडे व्यायामशाळेपासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. हर्षवर्धनचे आई-वडील आणि आत्या आल्याचे दिसताच हर्षवर्धनने रथातून खाली उतरून ज्येष्ठांचा वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेतले. त्यावेळी आई-वडिलांनी अभिमानाने हर्षवर्धनला आलिंगन दिले.महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन यांची लाडूने तुला !भगूरमध्ये हाती मानाची चांदीची गदा देऊन महाराष्टÑ केसरीचा पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला. त्यानंतर हर्षवर्धन यांची विहीतगाव येथे लाडूने तुला करण्यात आली. हे लाडू मित्रपरिवाराने एकमेकांना भरवून उपस्थित शेकडो एकमेकांना वाटले.पुरस्काराबाबत कुतूहलमहाराष्टÑ केसरीला दिली जाणारी मानाची चांदीची गदा प्रथमच सर्व भगूरकरांना याचि देही याचि डोळा बघायला मिळाल्याने त्या गदेबाबत कुतूहल असल्याचे दिसून येत होते. हर्षवर्धनसमवेत कुस्तीगीर मित्र, बलकवडे व्यायामशाळेतील बालकुस्तीपटू, महिला कुस्तीपटू तसेच भगूरकर असे सर्वच हर्षवर्धनशी हस्तांदोलन करत होते.

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा