सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखा अध्यक्षपदी हर्षल सुराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:34 IST2019-02-26T01:33:52+5:302019-02-26T01:34:10+5:30
दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी हर्षल दिलीप सुराणा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखा अध्यक्षपदी हर्षल सुराणा
नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी हर्षल दिलीप सुराणा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. २०१९-२० या कालावधीकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या नूतन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून हर्षल सुराणा यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी रोहन वसंत आंधळे तर सचिवपदी राजेंद्र विश्राम थेटे आणि खजिनदारपदी सोहिल परेश शाह यांचीदेखील एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सीएच्या अध्यक्षपदी राकेश कुमार हिंमतसिंग परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. सीए संजीवन ताम्बुलवाडीकर व पीयूष चांडक यांची कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मावळते अध्यक्ष मीलन लुनावत यांनी नूतन अध्यक्ष सुराणा यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. यावेळी वेस्टर्न प्रादेशिक कौन्सिलचे विक्रांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.