शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

नाशिकरोड परिसरात शाळांमध्ये हरिनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 AM

परिसरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी परिसरातून दिंडी काढून भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.

नाशिकरोड : परिसरातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी परिसरातून दिंडी काढून भजन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पूजन करण्यात येऊन परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी व टाळ-मृदंग घेऊन वारकरी वेशात सर्व विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या.  छाया जाधव यांनी आषाढी एकादशीची माहिती सांगितली. शोभा गरूड यांनी ‘किती किती आनंद रे पांडुरंगा’ हे भजन म्हटले. तसेच विद्यार्थिनींनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा गजर केला. यावेळी सुनीता सोनगिरे, सुरेखा पाटील, जयश्री भडके, मानसी झनकर, कल्याणी कुºहे, निर्मला दिवेकर, अरुण काळे आदींसह शिक्षक व पालक उपस्थित होते.नगरकर गुरुकुलनगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत ग्रंथदिंडीचे उद्घाटन नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. डावखरवाडी ते जयभवानीरोड या परिसरातून काढलेल्या दिंडीत विद्यार्थिनी लेजीम नृत्य करत सहभागी झाल्या होत्या. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा, ‘वाचाल तर वाचाल’ अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभुषा केली होती. वृक्षदिंडीत मुख्याध्यापिका संगीता पाटील, विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले होते.

टॅग्स :SchoolशाळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी