बद्रीनाथ येथे दुमदुमणार हरिनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 18:46 IST2018-09-26T18:46:20+5:302018-09-26T18:46:41+5:30
सप्ताहाचे आयोजन : मुंढेगावच्या गतीर परिवाराचा उपक्र

बद्रीनाथ येथे दुमदुमणार हरिनामाचा गजर
घोटी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील वारकरी संप्रदायातील गतीर परिवाराने चारधाम पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र बद्रीनाथ याठिकाणी साडेतीन दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून या सप्ताहासाठी सहभागी होणारे सर्व भाविक हे विमानाने गुरु वारी (दि.२७) प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांची ही विमानवारी पंचक्रोशीत कुतुहलाचा विषय बनली असून बद्रीनाथ स्थळी हरिनामाचा गजर दुमदुमणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार धनंजय महाराज गतीर, भरत महाराज गतिर यांच्या परिवारातील अनेक उपक्र म प्रेरणादायी असतात. यावेळी या परिवाराने दोन धाम यात्रा आयोजित केली आहे. यापैकी बद्रीनाथ धाम येथे अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी या सप्ताहास प्रारंभ होणार असून ३ आॅक्टोबर रोजी सांगता होणार आहे. या उपक्र मात दररोज पहाटे गरम पाणी कुंडस्नान, काकडा भजन,सकाळ-सायंकाळ कीर्तने, दुपारी बद्रीनाथ परिसर दर्शन, हरीपाठ असा दिनक्र म असणार आहे. या सोहळयासाठी जवळपास १०० भाविक, वारकरी सहभागी होणार असुन सर्वजण मुंबई ते दिल्ली असा जाण्याचा व परतीचा प्रवास विमानाने करणार आहेत.
विविध उपक्रम
धनंजय महाराज गतिर, भरत महाराज गतीर यांच्यासह कुटुंबातील सर्व सातही बंधु वारकरी संप्रदायात अग्रेसर आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार, ढोलकी वादक, आदिच्या माध्यमातून ते सेवा देत आले आहेत. मुंढेगाव येथे दरवर्षी महिनाभराचा सप्ताह, मुंढेगाव ते पंढरपुर वारी, संतांच्या नावाने विविध उपक्र म, आदि उपक्रम ते राबवित असतात.