दोघा अल्पवयीन मुलींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:42 IST2020-08-05T23:48:48+5:302020-08-06T01:42:30+5:30
नाशिक : शहरातील गंगापूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोघा अल्पवयीन मुलींचा तरुणांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे.

दोघा अल्पवयीन मुलींचा विनयभंग
नाशिक : शहरातील गंगापूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोघा अल्पवयीन मुलींचा तरुणांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे.
सार्वजनिक नळाला पाणी आले की नाही हे बघण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिलीप पगारे (२८, रा. शिवाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. मुलगी घरासमोरील नळाला पाणी आले की नाही हे बघण्यासाठी गेली असता ही घटना घडली.
संशयिताने तिचा रस्ता अडवून तिला उचलून स्वत:च्या राहत्या खोलीत नेले. ‘तु मुझे बहुत अच्छी लगती है’ असे सांगत दोन्ही हातांनी मिठी मारत स्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला.